Take a fresh look at your lifestyle.

‘या’ जिल्ह्यात घरबसल्या नोकरीची संधी; ऑनलाईन होतील मुलाखती

0

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्य आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” NASHIK ONLINE JOB FAIR-1 (2022-23)

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्याकडून 26 ते 28 एप्रिल दरम्यान ऑनलाइन पद्धतीने विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्थलांतरामुळे काही औद्योगिक आस्थापनांमध्ये आवश्यक मनुष्यबळाचा सहभाग आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यामुळे या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्यासाठी व नियोक्ते आणि नोकरी इच्छुक महिला उमेदवारांना एका छत्राखाली सुविधा उपलब्ध होण्याकरिता महास्वयम वेबपोर्टलवरून या मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे. या विशेष रोजगार मेळाव्याचा महिलांना लाभ घेता येणार आहे.

कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजन केला असून यामधील मुलाखती मोबाइल, दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने कोरोनामुळे जाहीर केलेल्या अनलॉकमध्ये काही अटी-शर्तींच्या अधीन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापना, व्यवसाय, उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

नियाेक्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन

भरती इच्छुक नियोक्ते यांनी रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair पर्यायावर क्लिक करून “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” NASHIK ONLINE JOB FAIR-1 (2022-23) यावर त्यांच्याकडील रिक्त पदे, जनरल, इपीपी, अप्रेंटिस अशी पदे अधिसूचित करावी. तसेच या मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागाच्या वरील वेबपोर्टलवर विनामूल्य करावी. या मेळाव्याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग नाशिकच्या सहायक आयुक्त श्रीमती अ. ला. तडवी यांनी केले आहे.

सेवा योजना नोंदणी आवश्यक

नियोक्त्याकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या ऑनलाइन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाइन मुलाखती घेण्यात येणार आहेत. बेरोजगारांना लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलवर लॉग-इन करावे लागेल. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉइड मोबाइलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत डाऊनलोड करून नोंदणी करावी, तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अप्लाय करावे लागेल.