Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांसाठी खुशखबर! टीसीएस करत आहे मेगाभरती; तब्बल 40 हजार पदे भरणार

0

देशातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएस (TCS) ने मेगाभरतीची घोषणा केली आहे. कोविडच्या काळातही फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.आता देखील टाटा समूहाची आयटी कंपनी (TCS) ने पदवीधर तरुणांसाठी बंपर भरती आणली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस गतवर्षीप्रमाणे यंदाही 40,000 कर्मचाऱ्यांची भरती करायची तयारी करत आहे.

टीसीएस ने सांगितले की 40,000 कर्मचाऱ्यांसह कॅम्पस मधून 1 लाख फ्रेशर्सची देखील भरती केली जाईल.

सध्या टीसीएस मध्ये 05, 92,125 कर्मचारी कार्यरत आहेत.

2019, 2020 किंवा 2021 मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेले उमेदवार या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात.

जर त्यांच्याकडे दहावी,बारावी, डिप्लोमा मधील प्रत्येकी” किमान एकूण (सर्व सेमिस्टर्स मधील सर्व विषय) 60 % किंवा 6 CGPA असेल.

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयाने ऑफर केलेल्या कोणत्याही स्पेशलायझेशन मध्ये B.E/B.Tech/M.E/M.Tech /MCA/MSC असलेले उमेदवार पात्र आहेत.

अर्ज करण्याची पद्धत 

उमेदवारांनी प्रथम ऑनलाईन वेबसाईटला भेट द्यावी.

मुख्यपृष्ठावर उमेदवारांनी TCS ऑफ कॅम्पस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी त्यांचा आयडी तयार करणे आवश्यक आहे .

नवीन वापरकर्त्यांनी ‘ड्राइवसाठी अर्ज करा’ पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे.

आता ‘नोंदणी करा’ पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला IT श्रेणी निवडावी लागेल.

तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा.

अधिकृत वेबसाईट- www.tcs.com