जिल्ह्यातील बांधवांसाठी महत्वाची बातमी! समाज कल्याण विभागाच्या विविध योजना आणि कसा घेता येईल लाभ
सामाजिक न्याय विभागाच्या योजना
गटाई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे
उद्दिष्ट- चामड्यांच्या वस्तू आणि पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनुसूचित जातीच्या व्यक्तींचे आणि पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी 100 % अनुदानावर पत्र्याचे स्टॉल देण्यात येत आहेत.
अटी व शर्ती- 1) अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी नसावे.
2) उत्पन्न मर्यादा ग्रामीण 40,000/- शहरी भागाकरिता 50,000/- पेक्षा जास्त नसावे.
3) स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्याच भाड्याने, कराराने, स्वतःची जागा, मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा त्यांच्या स्वमालकीची असावी.लाभाचे स्वरुप- 4 फुट x 5 फुट x 6.5 फुट इतक्या आकारमानाचा लोखंडी पत्र्याचा स्टॉल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
उद्दिष्ट- 10 वी नंतरच्या अभ्यासक्रमांना (11 वी, 12 वी) व 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक परंतु 2 वर्ष किंवा अधिक कालमर्यादा असलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 51000 रुपये लाभ देण्यात येतो.
अटी व शर्ती- 1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा.
3. विद्यार्थ्याला प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक.
4. विद्यार्थ्याचे ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे ते महाविद्यालय महानगरपालिका हद्दीपासून 05 कि.मी. च्या आत असणे आवश्यक आहे.
5. विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करू शकतात.
रमाई आवास (घरकुल)
उद्दिष्ट- अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देणारी आवास घरकुल योजना 2008 पासून सुरु करण्यात आली.
अटी व शर्ती- 1. लाभार्थीचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य 15 वर्ष असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्र रु. 70,000/- नगरपालिका
क्षेत्र रु. 1 लाख 50 हजार आणि महानगरपालिका क्षेत्र रु. 2 लाख इतकी आहे.
लाभाचे स्वरुप- 1. घरांच्या बांधकामासाठी क्षेत्र निहाय कमाल खर्चाची मर्यादा ग्रामीण क्षेत्र रु. 1 लाख 32 हजार नगरपालिका क्षेत्र रु. 2 लाख 50 हजार व महानगरपालिका क्षेत्र रु. 2 लाख 50 हजार इतकी आहे.
2. लाभार्थी हिस्सा ग्रामीण क्षेत्र निरंक व नगरपालिका क्षेत्र 7.5 टक्के, महानगरपालिकेला क्षेत्र 10 टक्के इतका आवश्यक.
3. ग्रामीण भागातील कुटुंबाला लाभार्थी हिस्सा भरण्यापासून सुट देण्यात आलेली आहे.
सैनिक शाळेतील अनुसूचित जाती/विजाभज/विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
उदिष्ट- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न विद्यार्थी दशेतच निर्माण व्हावी, विद्यार्थीमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांधनिक वृत्ती नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. इतर सैनिकी शाळेतील शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय अनु. जाती, जमाती, विजाभज, विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश,शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क भागविण्यासाठी वार्षिक रु. 15000/- प्रति विद्यार्थी निर्वाह भत्ता प्रदान करण्यात येतो.
अटी व शर्ती- 1. विद्यार्थी 6 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.
2. विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील अथवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावा.
3. पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. 65290/- पेक्षा जास्त नसावे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
उद्दिष्ट- सदर योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमिहिन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजुर कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत वाढावे व त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी याकरिता त्यांचे मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते.
अटी व शर्ती- लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाली असावा.- लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजुर असावा. लाभार्थी वयोमर्यादा 18 ते 60 वर्षापर्यंत राहिल. विधवा, परितक्त्या व देवदासी महिलांना प्राधान्य तहसीलदाराने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक.
लाभाचे स्वरुप- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती जमिन 100% अनुदान तत्वार देण्यात येते. पात्र लाभार्थ्यांची निवड सोडत पध्दतीने केली जाते.
मिनी ट्रॅक्टर
उद्दिष्ट- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील शेतकऱ्यांना 100% अनुदानावर पॉवर टिलरचा पुरवठा करण्याची योजना बंद करण्यात येवून त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90% अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
अटी व शर्ती- 1. सदर बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
2. बचत गटातील किमान 80 % सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.
3. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील, स्वयंसहाय्यता बचत गटांना वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
4. ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड सोडत पध्दतीने करण्यात येईल.
लाभाचे स्वरुप- 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर
मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शासकिय वसतीगृहे व निवासी शाळा चालविणे
उद्दिष्ट- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सामाजिक स्तर उंचावणे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे.
अटी व शर्ती- विद्यार्थी मागासवर्गीय असावा. विद्यार्थी स्थानिक नसावा. विद्यार्थ्याने स्थानिक शाळा महाविद्यालयात प्रवेशित असावा. विद्यार्थी पालकाचे उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे. विद्यार्थ्याचा प्रवेश त्याच्या गुणाणुक्रमानुसार होईल. विद्यार्थ्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
लाभाचे स्वरुप- शासकिय वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांची निवासाची, भोजनाची मोफत सोय करणे.शासकीय वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, गमबुट खरेदी भत्ता देणे. शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना इयत्ता 6 वी ते 10 वी शिक्षण उपलब्ध करून देणे. निवासाची, भोजनाची व शैक्षणिक साहित्याची मोफत सुविधा पुरविणे.
सैनिक शाळेतील अनुसूचित जाती/विजाभज/विमान प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
उद्दिष्ट- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्य दलात भरती होण्याची आवड विद्यार्थी दशेतच निर्माण व्हावी, विद्यार्थीमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांधनिक वृत्ती नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. इतर सैनिकी शाळेतील शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय अनु. जाती, जमाती, विजाभज, विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क भागविण्यासाठी वार्षिक रु. 15000/- प्रति विद्यार्थी निर्वाह भत्ता प्रदान करण्यात येतो.
अटी व शर्ती- 1. विद्यार्थी 6 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.
2. विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील अथवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावा.
3. पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. 65290/- पेक्षा जास्त नसावे.
अधिक माहितीसाठी संपर्क
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव