Take a fresh look at your lifestyle.

UPSC उत्तीर्ण युवकांना मुलाखतीसाठी मार्गदर्शन; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा पुढाकार

0

UPSC (केंद्रिय लोक सेवा आयोग) ने घेतलेल्या विविध पदांच्या लेखी परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील आणि जिल्ह्यास जोडलेल्या इतर भागातील युवकांनी यश मिळविलेले आहे. अशा युवकांना आता मुलाखतीस सामोरे जायचे आहे. पदासाठी निवड होण्यात मुलाखत हाच अंतिम व महत्त्वाचा टप्पा आहे. मुलाखती संयम व आत्मविश्वासाने सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सध्या सरकारी सेवेत विविध पदांवर कार्यरत अनुभवी अधिकारी व विषय तज्ज्ञ हे मुलाखत कशी द्यावी याचे मार्गदर्शन करणार आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखी परीक्षा उत्तीर्ण युवकांनी DAF व संपर्क क्रमांक collector.jalgaon@maharashtra.gov.in ला ई-मेल करावा. त्यानंतर संबंधितांना प्रशिक्षणाविषयी माहिती दिली जाईल.