Take a fresh look at your lifestyle.

जळगाव शहरातील कॉलनी असो वा परिसर, तक्रार निवारण एका कॉलवर…

0

जळगावकरांनो, आपण राहत असलेल्या कॉलनी वा परिसरात अस्वच्छता, प्रदूषण, पथदिवे, गटार/मलनिस्सारण यासारखे नागरी सुविधेसंदर्भातील प्रश्न/तक्रारी असल्यास त्या त्वरित “महापौर सेवा कक्ष” येथे अवश्य नोंदवा.

आपल्या परिसरातील नागरी समस्या / तक्रारींची माहिती “महापौर सेवा कक्ष” – 95 90 269 269 या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 2:30 ते सायं. 5 या वेळेत (शासकीय सुटी वगळता) आपणास कॉल करून नोंदविता येईल. आपल्या तक्रारींचे निवारण महापालिकेतर्फे होण्याची गती दिवसागणिक वाढतच आहे. नागरिकांत यासंदर्भात सकारात्मकताही रुजत आहे. आपल्या या कार्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांनाही त्याचा लाभ होईल अन् तेही नक्कीच आपणास धन्यवाद देतील. त्यामुळे आपण निसंकोचपणे “महापौर सेवा कक्ष” कडे तक्रार पाठवा, तिचा पाठपुरावा तत्परतेने करून त्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.