Take a fresh look at your lifestyle.

करिअर डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने युवक-युवतींना करिअर प्लॅनिंग बद्दल मार्गदर्शन घेण्याचे आवाहन

0

2014 पासून युवा क्रांती संघ संचालित तळा तालुक्यात आपलं करिअर डेव्हलपमेंट सेंटर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या करिअर प्लानिंग बद्दल मार्गदर्शन त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून करतो आहोत. भारतात व भारता बाहेर उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यात येते. अशाच प्रकारचे कायमस्वरूपी सेंटर मुंबईत ही असावं असं अनेकांचा आग्रह आहे. त्या नुसार आपण ठाणे येथे तशाच प्रकारचे करिअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात येत आहे. हे सेंटर बौध्द प्रगती मंडळ, ठाणे व पिपल्स डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आहे.

खालील उपक्रम करिअर डेव्हलपमेंट सेंटर मध्ये राबवले जातील.

1. दहावी, बारावी, पदवी नंतर उपलब्ध असलेल्या संधी ह्या बद्दल माहिती दिली जाईल, तज्ञांकडून या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल.

2. परदेशात उलब्ध असलेल्या संधी ह्या बद्दल माहिती दिली जाईल. तसेच परदेशातल्या निरनिराळया विद्यापीठात प्रवेश घेण्यासंबंधी माहिती दिली जाईल. प्रवेश परीक्षा इत्यादीची माहिती दिली जाईल.

3. मोटिवेशनल कार्यक्रम आयोजित केले जातील.

4. प्रवेशासाठी लागणारे सर्व प्रमाणपत्रे कशी व कुठून उपलब्ध होतील व ते मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. (कास्ट सर्टिफिकेट , व्हॅलिडिटी सर्टिफिकेट , डोमोसाईल सर्टिफिकेट इत्यादी)

एक दिवसाच्या चर्चा सत्रात सेमिनार मध्ये विध्यार्थ्यांना फारसा फायदा होतांना दिसत नाही. हे सेंटर कायमस्वरूपी असेल. सेंटर चे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल. 

उदघाटन- दिनांक- 12 एप्रिल, वेळ सायं. 7 वाजता.

स्थळ- बुध्द विहार, जेतवन परिसर, पवार नगर. ठाणे (प)

उदघाटक- प्रकाश रविराव

अध्यक्ष- विरेंद्र जाधव

संकल्पना मांडणी व मार्गदर्शन- सुनील कदम

सेंटर समन्वयक- आयुष्यमानिनी वीणा कांबळे, वसुधा भस्मे, ज्योती रंगारी, ऍड.मधुकर लांडगे

प्रमुख उपस्थिती

आयु.सुमित खोब्रागडे, जालिंदर यादव, अविनाश दारोळे, संदेश सोनावणे, मनोज बागुल, विनय गांगुर्डे, विजय ब्राह्मणे, विजय भालेराव, प्रवीण बागुल, अनिल मोरे, शरद कलावंत, विनोद शहारे, सुहास बागडे, प्रसन्न सोनवणे

मनिष गांगुर्डे, सुनिल गायकवाड, बँक डायरेक्टर डॉ संतोष तायडे यांच्यावतीने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी

ठाणे स्टेशन बस क्र. १२

मुलुंड स्टेशन बस क्र. ११०, ४८४