अग्निशमन दलात लवकरच 900 फायरमनची कायमस्वरूपी भरती, लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, मेडिकल टेस्टनंतर मेरिटवर निवड होणार
अग्निशमन दलात लवकरच 900 फायरमनची कायमस्वरूपी भरती होणार आहे. या भरतीसाठी कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, मेडिकल टेस्टनंतर मेरिटवर या फायरमनची निवड होणार आहे. या भरतीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल हेमंत परब यांनी दिली.
पालिकेच्या अग्निशमन दलात 2600 अधिकारी-कर्मचारी आहेत. आगीसह कोणत्याही दुर्घटनेत मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही अग्निशमन दलाच्या पातळीवर सुरू आहे. मे किंवा जून महिन्यात या भरतीबाबत प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेवी ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत. ऑगस्ट 2016 नंतर ही भरती होत असल्यामुळे रोजगाराची संधी आणि अग्निशमन दलात नोकरी करून शौर्य गाजवण्याची संधीही उमेदवारांना मिळणार आहे.

सहा महिन्यांचे प्रशिक्षण
900 पदांच्या या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जाहिरातीनंतर ऑनलाइन करणाऱया उमेदवारांची टाटा कन्सलटन्सीकडून ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
यामध्ये पात्र ठरणाऱया उमेदवारांमधून मैदानी चाचणीसाठी उमेदवार निवड केले जातील. यानंतर मेडिकल चाचणीत पात्र ठरणाऱया उमेदवारांमधून मेरिटवर अंतिम निवड केली जाईल.
भरतीमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण असेल. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल.
यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.
ठाणे शहर घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात विस्तारले असून या भागात अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. वाढत्या नागरीकरणाबरोबर मॉल्स, दुकाने, हॉटेल्स आणि इतरही अनेक आस्थापना याठिकाणी आहेत. घोडबंदर रोडवर वाहनांची कायमच वर्दळ असते. या परिसरात गायमुख चौपाटी, थीम पार्कसह इतरही अनेक प्रकल्प ठाणे महापालिकेने उभारले आहेत. मात्र या भागात अग्निशमन केंद्र सुरू करण्यास महापालिकेला लवकर मुहूर्त मिळाला नाही. घोडबंदर भागात छोट्या-मोठ्या आगी लागण्याचे प्रकार कायमच घडत असतात. शिवाय घोडबंदर रस्त्यावर अपघात सातत्याने होत असतात. त्यामुळे वाहतूक थांबते. आधी घोडबंदर परिसरात अग्निशमन केंद्र नसल्याने, आग किंवा भीषण अपघातप्रसंगी मदतीसाठी बाळकूम, नितीन जंक्शन, वागळे इस्टेट किंवा जवाहरबाग अग्निशमन केंद्रातून घटनास्थळी पोहचण्यास जवानांना उशीर होत असे. त्यातच घोडबंदर रस्त्यावरील कायमच वाहतूककोंडीचा फटका अग्निशमन दलाच्या गाड्यांना बसत होता. त्यामुळे घोडबंदर भागात अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.
अखेर इतक्या वर्षांनी घोडबंदर रस्त्यावरील आनंदनगर येथे महापालिकेने ओवळा अग्निशमन केंद्र बांधले. परंतु, अद्यापही हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झालेले नाही. अगोदरच ठाणे अग्निशमन दलामध्ये मनुष्यबळाचा तुटवडा असून अनेक पदे रिक्त आहेत. ओवळा अग्निशमन केंद्रात एका पाळीमध्ये केवळ चारच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. केंद्राचे कामकाज तीन पाळ्यामध्ये चालत असले, तरी कर्मचाऱ्यांअभावी जास्तीचे कर्मचारी देणार कोठून, असा प्रश्न अग्निशमन अधिकारीच उपस्थित करत आहेत. या केंद्रात सध्या एकच लहान गाडी ठेवण्यात आली आहे. मोठ्या गाड्यांसाठी अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. या केंद्रात फोनची सुविधाही चालू झालेली नसल्याची बाब समोर आली आहे.
किमान ४० कर्मचाऱ्यांची गरज
एका अग्निशमन केंद्रामध्ये अधिकारी वर्गासह ३२ फायरमन, सहा लीडिंग फायरमन, आठ चालक अशा एकूण ४० पेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्याशिवाय दोन फायर इंजिन, एक पाण्याचा टँकर, अत्यावश्यक परिस्थितीसाठी आणखीन एक पाण्याचा टँकरही केंद्रामध्ये असणे आवश्यक आहे.
रिक्त पदांची संख्या मोठी
ठाणे अग्निशमन दलामध्ये मंजूर असलेल्या फायरमनच्या ४५० पदांपैकी १६८ पदे भरलेली असून लीडिंग फायरमनची ७० पदांपैकी १५ पदे, चालकांची २२४ पैकी ३५ पदे, स्टेशन अधिकारी २१ पदांपैकी दोन पदे, सहाय्यक अग्निशमन अधिकाऱ्यांची ५६ पैकी १७ पदे भरलेली आहेत. मोठ्या संख्येत असलेली ही रिक्त पदे कधी भरली जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.