विघ्नहर्ता हेल्थकेअर अँण्ड मेडीकल सर्व्हिसेसच्या वतीने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ‘आरोग्य समृद्धी योजनेचा’ लाभ घेण्याचे आवाहन
सदर योजना कोणतीही मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स नसून कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करतांना येणाऱ्या अडचणींवर प्रभावी उपाय म्हणून काम करते.

आरोग्य समृध्दी योजनेसाठी पात्रता
१) शासकीय किंवा निमशासकीय (१००% अनुदानित) कार्यरत कर्मचारी या योजनेस पात्र आहे.
२) आरोग्य समृध्दी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकिय देखभाल) नियम : १९६१ व त्यानुसार निर्गमित केलेले नियम सुधारणेनुसार अवलंबून असणारे कुटुंबातील सभासद स्वत: व कुटूंबातील अवलंबून असलेली पती/पत्नी, पहिली दोन मुले दि. १ मे २००१ तत्पुर्वीचे अवलंबून असलेले ३ रे अपत्ये, अवलंबून असलेले आई-वडील, सासू- सासरे हे पात्र राहतील.
३) कर्मचाऱ्यावरील अवलंबून असलेले अपत्या चे वय हे २५ पेक्षा कमी तसेच ते लग्न झालेले किंवा नोकरीस नसेल तर तो/ती या योजनेस पात्र आहे. निमसरकारी अवलंबून असलेले आईवडील किंवा महिला कर्मचाऱ्याच्या बाबतीत आई वडील किंवा सासू सासरे राज्य/केंद्र सरकारी व निमसरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेले असल्यास व त्यांना निवृत्ती वेतन मिळत असेल/नसेल तरी अन्य मार्गांनी मिळणारे उत्पन्न हे दरमहा ९०००/- इतके मूळ निवृत्ती वेतन घेणाऱ्या सेवानिवृत्ती राज्य शासकीय कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या उपलब्धीच्या मर्यादेत म्हणजे ९०००/- कमी असेल तर ती/तो या योजनेस पात्र आहे.
आरोग्य समृध्दी योजनेचे महत्वाचे फायदे
१) महाराष्ट्रातील नामवंत हॉस्पिटल मध्ये २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांसाठी ॲडमिट झाल्यावर २४ तासात कॅशलेस सेवा उपलब्ध
२) २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांसाठी ३ लाखांपर्यंत कॅशलेस चा फायदा (ना देयकाचा समावेश नाही.)
३) ३ लाखांपर्यंत कॅशलेस संपल्यानंतर गरज भासल्यास ॲडिशनल २ लाख कॅशलेसची सुविधा संपूर्ण कुटूंबासाठी राखीव असेल.
४)डिस्चार्ज च्या वेळी ना देयक सोडून कोणतेही बिल न भरता डिस्चार्ज मिळेल.
५) डिस्चार्ज नंतर वैद्यकीय प्रतीपुर्ती फाईल बनविणे, फाईल कार्यालयात जमा करणे, जिल्हा शल्यचिकित्सका कडून पारित करणे, कार्यालयातील जमा असलेले बिलाचे फॉलोअप घेणे इत्यादी कामे कंपनी करते.

महत्वाची सुचना- १) डिस्चार्ज करतेवेळी वैद्यकीय प्रतिपूर्ती चे सर्व कागदपत्र वर सहीकरून देणे बंधनकारक आहे. तसेच सॅलरी अकाऊंट चा (अकाऊंट पे) चेक व प्रॉमीसरी नोट देणे बंधनकारक राहील.
२) बिल पारित झाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या अकाऊंटला जमा झालेली रक्कम कंपनीला डिस्चार्जच्या वेळी दिलेल्या सॅलरी अकाऊंटच्या चेकने २४ तासात देणे बंधनकारक राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क
मुख्य कार्यालय : प्लॉट नं.14, सर्व्हे नं.397, समर्थ कॉलनी, एम.जे. कॉलेजजवळ, जळगांव
www.vighnahartahealthcare.com
Email : info@vighnahartahealthcare.com
Customer Care No- 9765500876