Take a fresh look at your lifestyle.

शासन निर्णय! वर्ष २०२१-२०२२ या वर्षामध्ये कोरोना (कोविड-१९) मुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार अर्थसहाय्य

0

महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक :पुरक-२०२१/प्र.क्र.१३२/का-०३

केंद्र शासनाच्या “PM CARES For Children- Empowerment of COVID Affected चिल्ड्रेन “ह्या योजनेव्यतिरिक्त राज्य शासनाकडून कोरोना (कोविड-१९) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय उपरोक्त वाचा क्र.१ अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने वाचा क्र. २ अन्वये यापुर्वी एकूण ४०० बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. “कोरोना (कोविड-१९) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणेबाबत” या योजनेंतर्गत उपलब्ध निधीचा विनियोग सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाकरिता “कोरोना ( कोविड-१९) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकानां अर्थ सहाय्य मिळणेबाबत नवीन योजना” या योजनेकरिता वित्त विभागाने रु. २०.०० कोटी ऐवढा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर योजनेकरिता अर्थसंकल्पित निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय 

उपरोक्त पार्श्वभूमीच्या अनुषंगाने, “कोरोना (कोविड-१९) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणेबाबत”अर्थसंकल्पित रु.२०.०० कोटी/-(अक्षरी रुपये वीस कोटी) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आली. यासाठी येणारा खर्च २२३५ सी-५०१, ३१ सहायक अनुदान (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांना वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आली. सन २०२१-२२ साठीचा निधी खर्च करतांना वित्त व नियोजन विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश, सूचना, परिपत्रके, अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच हा खर्च मागणी क्रमांक क्र.एक्स-१, २२३५ सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२ समाज कल्याण, १०२ बाल कल्याण,१९ कोविड-१९ कालावधीत अनाथ झालेल्या बालकांसाठी अर्थसहाय्य (१९) (०१) कोविड-१९ कालावधीत अनाथ झालेल्या बालकांसाठी अर्थसहाय्य योजना, ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२३५८५०१) या लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरिता मंजूर असलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा. शासन निर्णय क्रमांकः पुरक-२०२१/प्र.क्र.१३२/का-०३ सदर योजनेंतर्गत वितरीत निधीचा विनियोग करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांना नियंत्रक अधिकारी तथा सनियंत्रक तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. 

 

हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. अनौ.सं.क्र. २९/व्यय-६ दि.०२.०२.२०२२ अन्वये निर्गमित करण्यात आला.