नागरिकांसाठी दिलासा! महसूल सेवांमध्ये मोठे सुलभीकरण
GPR अंतर्गत नवे नियम, कमी कागदपत्रे आणि जलद सेवा

महसूल व वन विभागाच्या दि. ३० मार्च २०२६ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, नागरिकांना महसूल विभागामार्फत प्रदान केल्या जाणाऱ्या विविध दाखले व सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण करण्यासाठी Governance Process Re-engineering (GPR) संकल्पना अंमलात आणण्यात आलेली आहे. या अंतर्गत अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, मंजुरीची पातळी व प्रमाणपत्रांचे स्वरूप यामध्ये सुधारणा करून राज्यभर एकसमान (Unique Format) नमुने लागू करण्यात आले आहेत. तथापि, सुधारित नमुन्यांची माहिती क्षेत्रीय कार्यालयांना अपुरी प्रमाणात उपलब्ध असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, सर्व संबंधित विभागांनी तात्काळ आवश्यक सूचना व कार्यवाही करणे आवश्यक आहे.
वरील लिंक ला क्लिक करून सविस्तर वाचा 👆