हरित उर्जेकडे मोठे पाऊल: विमान इंधनात इथेनॉल मिश्रणाला केंद्राची परवानगी
ATF मध्ये इथेनॉल वापराचा मार्ग मोकळा; मात्र प्रमाण व अंमलबजावणीबाबत निर्णय अद्याप प्रलंबित

🔹 इथेनॉल म्हणजे काय?
इथेनॉल हे एक प्रकारचे जैवइंधन (Biofuel) असून ते पर्यावरणपूरक मानले जाते. सध्या याचा वापर मुख्यतः पेट्रोलमध्ये मिश्रण करून केला जातो.
🔹 इथेनॉल कसे तयार होते?
ऊस, मका, तांदूळ, गहू, ज्वार, बाजरी आणि इतर मिलेट्स यापासून किण्वन प्रक्रियेद्वारे इथेनॉल तयार केले जाते.
भारताचा इथेनॉल सम्मिश्रण कार्यक्रम
भारत सरकारने इंधन आयात कमी करण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम सुरू केला आहे.
▪️ E10 – 10% इथेनॉल + 90% पेट्रोल
▪️ E20 – 20% इथेनॉल + 80% पेट्रोल
विमानांचे इंधन – ATF (Aviation Turbine Fuel)
🔸 ATF हे सामान्य पेट्रोल किंवा डिझेलसारखे नसून केरोसीन-आधारित अत्यंत शुद्ध हायड्रोकार्बन मिश्रण असते.
🔸 रंग – रंगहीन किंवा हलका पिवळसर
🔸 घनता – 15°C तापमानाला 775 ते 840 kg/m³
महत्त्वाची बाब
🔹 केंद्र सरकारने ATF मध्ये इथेनॉल मिश्रणाला तत्त्वतः परवानगी दिली आहे.
🔹 मात्र, इथेनॉलचे प्रमाण किती असावे?
🔹 आणि अंमलबजावणी कधीपासून होणार?
➡️याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
हा निर्णय भारताच्या हरित ऊर्जा धोरणाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे. यामुळे इंधन आयात कमी होणे, शेतकऱ्यांना फायदा आणि पर्यावरण संरक्षण यांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.