Take a fresh look at your lifestyle.

सहायक नगर रचनाकार पदाची तात्पुरती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

नगर विकास विभागातील भरती प्रक्रियेला वेग

0

महाराष्ट्र नगर रचना व मूल्यनिर्धारण सेवा, गट-ब अंतर्गत सहायक नगर रचनाकार (श्रेणी-एक) पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला असून, संबंधित पदाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात क्रमांक ५१/२०२४ अंतर्गत या पदासाठी उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ७ ते १० एप्रिल २०२६ तसेच १५ ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता प्राथमिक स्वरूपातील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, ही गुणवत्ता यादी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक २३७/२०२६ व २८२/२०२६ तसेच संभाजीनगर येथील मूळ अर्ज क्रमांक २६२/२०२६ या प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

सदर गुणवत्ता यादी ही तात्पुरत्या स्वरूपाची असून, उमेदवारांनी अर्जामध्ये सादर केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. पडताळणीदरम्यान काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होण्याची शक्यता असून त्यानुसार गुणवत्ताक्रमात फेरबदल होऊ शकतो किंवा काही उमेदवार अपात्रही ठरू शकतात, अशी सूचना आयोगाने दिली आहे.