Take a fresh look at your lifestyle.

MPSC मुख्य परीक्षा २०२५: उत्तरपुस्तिका संदर्भातील अत्यंत महत्त्वाची सूचना

विषय : जाहिरात क्रमांक ००१/२०२६ – राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०५, १८, १९ व २६ एप्रिल २०२६ तसेच ०२ मे २०२६ रोजी आयोजित होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ ही प्रथमच पारंपरिक / वर्णनात्मक स्वरूपात घेतली जाणार आहे.

या परीक्षेच्या उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकन डिजिटल प्रणालीद्वारे (On Screen Marking) करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेचे मुखपृष्ठ, उत्तरपुस्तिकेचे मागील पृष्ठ (Back Page) तसेच प्रवेशप्रमाणपत्रावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.

महत्त्वाच्या सूचना

1)प्रत्येक उत्तर नवीन पृष्ठावर सुरू करावे. प्रश्न/उपप्रश्न क्रमांक डाव्या बाजूच्या समासात स्पष्ट, सुवाच्य व ठळक अक्षरात लिहावा.

2)एका प्रश्नातील सर्व उपप्रश्नांची उत्तरे एकत्र व सलग लिहिणे बंधनकारक आहे. वेगळ्या ठिकाणी लिहिल्यास त्या उत्तरांचे मूल्यांकन करण्यात येणार नाही.

3)आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. अशा बाबतीत कोणतेही निवेदन किंवा तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

4)नियमभंग झाल्यास आयोग आपल्या स्वेच्छाधिकारानुसार योग्य ती कारवाई करेल.

सु. ह. अवताडे

सह सचिव, परीक्षा पूर्व

महाराष्ट्र लोकसेवा आयोग