Take a fresh look at your lifestyle.

जळगावच्या युवकांसाठी सुवर्णसंधी: भारत पेट्रोलियम, डाबर, HDFC व रिलायन्समध्ये इंटर्नशिप!

0

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील युवकांसाठी १२ जागा खुल्या झाल्या आहेत.

या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल, तसेच दरमहा ९,००० रुपये मानधन आणि इंटर्नशिप सुरू करताना एकरकमी ६,००० रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.

जिल्ह्यातील प्रमुख कंपन्या जसे की भारत पेट्रोलियम, डाबर इंडिया लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज येथे या इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. दहावी, बारावी, डिप्लोमा किंवा पदवी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in⁠ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ प्रत्यक्ष भेट देऊन माहिती मिळवता येईल, असे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी सांगितले आहे.