Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो, धरणातील ‘काळं सोनं’ आता तुमच्या शेतात!

0

जलस्त्रोतांमधील साचलेला गाळ उपसा करून तो शेतात पसरवण्यासाठी राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना २०२६-२७ या वर्षासाठी कार्यान्वित झाली आहे. या योजनेअंतर्गत यावल आणि रावेर तालुक्यातील धरणांमधील सुपीक गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जात आहे.

वर्षानुवर्षे साचलेला हा गाळ नैसर्गिक खतांचा उत्तम स्रोत असून, यामुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात वाढते. शेतकऱ्यांनी फक्त गाळ वाहून नेण्याचा खर्च करायचा असून, गाळ पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे.

कुठे संपर्क साधाल: इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने मागणी अर्ज सादर करून प्रशासकीय परवानगी मिळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी यावलचे नायब तहसीलदार श्री. अतुल गांगुर्डे (९८८१२९००४) आणि रावेरचे नायब तहसीलदार श्री. संजय तायडे (९८२३९७७५९३) यांच्याशी संपर्क साधावा.