‘डिजिटल शेतीशाळा २०२६’चा शुभारंभ; शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचे ऑनलाईन ज्ञानदालन
एप्रिलभर दर आठवड्याला यूट्यूबवर थेट
जळगांव- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान बदलाला अनुरूप शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी एप्रिल २०२६ महिन्यात ‘डिजिटल शेतीशाळा २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
या डिजिटल शेतीशाळेमध्ये कृषी तज्ञांकडून पिक व्यवस्थापन, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, निविष्ठा उत्पादन तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम दर आठवड्याला सायंकाळी ७.३० वाजता ऑनलाईन आयोजित केला जाईल. याचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर उपलब्ध असेल.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
दि. १ एप्रिल : पेरणीपूर्व नियोजन
दि. ८ एप्रिल : निविष्ठा व जैविक उत्पादन
दि. १५ एप्रिल : एकात्मिक कीड व्यवस्थापन
दि. २२ एप्रिल : भात लागवड तंत्रज्ञान
शेतकरी पुढील यूट्यूब लिंकद्वारे सहभागी होऊ शकतात.
1. www.youtube.com/@agricultureDepartmentGoM
2. www.youtube.com/@PoCRAMaharashtra/streams
3. www.youtube.com/@Pannifoundation/live
या उपक्रमात जिल्ह्यातील शेतकरी गट, एफपीओ, कृषी ताई तसेच महिला बचत गटांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.