Take a fresh look at your lifestyle.

बार्टीकडून MPSC गट-ब मुख्य परीक्षेसाठी १० हजारांचे आर्थिक सहाय्य जाहीर

अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य; अर्जासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा तयारीसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे.

 

या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना एकरकमी १०,००० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या योजनेमागील उद्देश आहे.

पात्रता निकष:- या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा असावा. तसेच तो MPSC अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२५ (जाहिरात क्र. ११७/२०२५) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया:- उमेदवारांनी १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिलेल्या गुगल फॉर्म लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. यासोबतच जाहिरातीतील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह हार्ड कॉपी १७ एप्रिल २०२६ पर्यंत बार्टी, पुणे कार्यालयात पोस्ट किंवा कुरिअरद्वारे पाठवावी लागणार आहे.

दोन्ही पद्धतीने (ऑनलाईन व ऑफलाईन) अर्ज करणे अनिवार्य असून, अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येणार असल्याचे बार्टीने स्पष्ट केले आहे.

आवश्यक कागदपत्रे:- अर्जासोबत जात प्रमाणपत्र/वैधता प्रमाणपत्र, रहिवास दाखला, MPSC पूर्व परीक्षा प्रवेशपत्र, आधार कार्ड तसेच अर्जदाराच्या नावावर असलेल्या बँक पासबुकची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

संपर्क व पत्ता

अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),

२८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – ४११००१

अधिक माहितीसाठी ०२०-२६३३३३३० / २६३३३३३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या योजनेमुळे अनुसूचित जातीतील उमेदवारांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी आर्थिक आधार मिळणार असून, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा सहभाग आणि यश वाढण्यास मदत होणार आहे.