Take a fresh look at your lifestyle.

गॅस अपडेटचा बहाणा… खातं साफ करण्याचा डाव!

सायबर भामट्यांचा नवा सापळा उघड

0

शहरासह जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी आता ‘गॅस केवायसी अपडेट’च्या नावाखाली सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्याचा नवा फंडा सुरू केला आहे. गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत किंवा सबसिडीचे आमिष दाखवून नागरिकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्याचे प्रकार समोर येत आहेत.

असा रचला जातो सापळा:- भामटे नागरिकांना “तुमचे गॅस कनेक्शन बंद होणार” किंवा “तत्काळ KYC अपडेट करा” असे मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये संशयास्पद लिंक किंवा APK फाईल दिलेली असते. एकदा का नागरिकाने त्या लिंकवर क्लिक केले किंवा फाईल डाउनलोड केली, की काही क्षणांतच मोबाईलवर नियंत्रण मिळवत बँक खातं रिकामं केलं जातं.

फक्त गॅसच नाही… फसवणुकीचे अनेक डाव

सायबर गुन्हेगार विविध मार्गांनी नागरिकांना गंडवत आहेत:

▪️ जादा परताव्याचे आमिष दाखवणारे शेअर ट्रेडिंग स्कॅम

▪️ ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली भीती दाखवून खंडणी

▪️ ई-चलन, अश्लील व्हिडिओ आदी माध्यमातून ब्लॅकमेलिंग

फसवणूक झाली तर काय कराल? ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीसांकडे तक्रार नोंदवा. वेळेत कारवाई केल्यास आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.