Take a fresh look at your lifestyle.

जळगावातील दिव्यांगत्व तपासणी आता सोमवार ते शुक्रवार चालणार

0

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारी गैरसोय कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दिव्यांग मंडळाची तपासणी फक्त दर बुधवारी केली जात होती.

तथापि, अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आता ही तपासणी सोमवार ते शुक्रवार दररोज सुरू राहणार आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या तपासण्या वेळेत आणि सोयीस्कर पद्धतीने पूर्ण करता येणार आहेत.

ज्या दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग विभागाकडून एसएमएस संदेश येईल, त्यांनी त्या संदेशात नमूद केलेल्या तारखेस उपस्थित राहणे गरजेचे आहे.

अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांनी सर्व दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व तपासणीसाठी सोमवार ते शुक्रवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ही नवीन व्यवस्था दिव्यांग व्यक्तींना वेळेवर प्रमाणपत्र मिळवण्यास मदत करणार आहे, त्यामुळे गैरसोयीचा प्रश्न आता कमी होईल.