Take a fresh look at your lifestyle.

“गंगाराम, चहा आण!” — एका हाकेतून घडले सामाजिक परिवर्तन

केवळ चहाची गोष्ट नव्हे, तर समतेचा सुवास पसरवणारी एक प्रेरणादायी क्रांती होती

0

राजर्षी शाहू महाराज फक्त राज्यकर्ते नव्हते, ते समाजमनाचे खरे शिल्पकार होते. गंगाराम कांबळे यांना चहाचे दुकान सुरू करण्यास त्यांनी दिलेले प्रोत्साहन हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

महाराज स्वतः त्या छोट्याशा दुकानात जाऊन “गंगाराम, चहा आण!” अशी हाक मारत. त्यांच्या या साध्या कृतीमागे मोठा संदेश दडलेला होता. महाराजांसोबत येणाऱ्या मंडळींनाही मग तिथे चहा घ्यावा लागे—आणि हळूहळू भेदभावाच्या भिंती कोसळू लागल्या.

“हाताशी असलेली सत्ता जर समाजातील दुर्लक्षित घटकांचे जीवन सुधारू शकत नसेल, तर त्या सत्तेचा उपयोग तरी काय?” — ही जाणीव कृतीत उतरवणारा खरा लोकराजा म्हणजेच राजर्षी शाहू महाराज.

राजर्षी शाहू महाराजांनी ‘गंगाराम कांबळे’ या दलित व्यक्तीला हॉटेल काढून दिले आणि स्वतः तिथे जाऊन “गंगाराम, चहा आण!” अशी हाक मारून चहा पिला. ही केवळ चहाची चव नव्हती, तर शतकानुशतके चालत आलेल्या जातीयतेच्या भिंती पाडणारी एक क्रांती होती.

ही केवळ चहाची गोष्ट नव्हे, तर समतेचा सुवास पसरवणारी एक प्रेरणादायी क्रांती होती.