Take a fresh look at your lifestyle.

भारतातील संशोधकांसाठी फुलब्राइट-नेहरू फेलोशिपची सुवर्णसंधी

0

भारतातील संशोधक, पीएच.डी. विद्यार्थी आणि नवोदित प्राध्यापकांसाठी फुलब्राइट-नेहरू फेलोशिपची संधी जाहीर करण्यात आली आहे. ही फेलोशिप युनायटेड स्टेट्स इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशन (USIEF) द्वारे २०२७-२८ शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध आहे.

फेलोशिप अंतर्गत भारतीय संशोधकांना अमेरिकेत उच्च दर्जाच्या संशोधन सुविधा, मार्गदर्शन आणि संसाधनांचा लाभ घेऊन उच्च दर्जाचे संशोधन करण्याची संधी मिळणार आहे.

फेलोशिप प्रकार:

डॉक्टरल फेलोशिप: पीएच.डी. करत असलेल्या संशोधकांसाठी, कालावधी ६ ते ९ महिने (अर्जाची अंतिम तारीख: १ जुलै २०२६)

पोस्ट-डॉक्टरल रिसर्च फेलोशिप: नवोदित प्राध्यापक/संशोधकांसाठी, कालावधी ८ ते २४ महिने (अर्जाची अंतिम तारीख: १५ जुलै २०२६)

अकॅडमिक अँड प्रोफेशनल एक्सलन्स फेलोशिप: अनुभवी प्राध्यापक/व्यावसायिकांसाठी, कालावधी ४ ते ९ महिने

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ip@usief.org.in या ई-मेलवर संपर्क साधावा.

सर्व विद्यापीठे व संस्थांना आवाहन: ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत व प्राध्यापकांपर्यंत पोहचवावी, जेणेकरून जास्तीत जास्त संशोधक या संधीचा लाभ घेऊ शकतील.