दिव्यांगांसाठी मोठा निर्णय: गृहनिर्माण ते स्वयंरोजगार योजनांपर्यंत व्यापक सुविधा उपलब्ध
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना, सवलती व अनुदानासाठी पात्र ठरवले आहे.
यापूर्वी 1995 च्या कायद्यानुसार केवळ 7 प्रवर्गांपुरते मर्यादित लाभ आता विस्तारून सर्व दिव्यांगांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे नव्याने समाविष्ट प्रवर्गांनाही योजनांचा प्रत्यक्ष फायदा मिळणार आहे. या लाभासाठी किमान 40% दिव्यांगत्व व वैध UDID कार्ड आवश्यक राहणार आहे.
या निर्णयामुळे गृहनिर्माण, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार, बीज भांडवल, उपकरण सहाय्य अशा विविध योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळणार आहे. दिव्यांगांच्या सर्वसमावेशक सक्षमीकरणासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा असल्याचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.