Take a fresh look at your lifestyle.

८-१४ एप्रिल सामाजिक समतेचा आठवडा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसह जगा, समतेचा संदेश पसरवा

0

महाराष्ट्र शासनाने राज्यभर “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम” ८ एप्रिल ते १४ एप्रिल, २०२६ दरम्यान साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आठवड्यात महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्याने, वक्तृत्व, निबंध व लघुनाट्य स्पर्धा, तसेच संत गाडगे महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारे उपक्रम राबविले जातील.

तसेच संविधान जागर, महिला मेळावे, जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील.

सदर सप्ताहाचे उद्घाटन व समारोप प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करणार आहे.

हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करेल आणि राज्यभर सामाजिक समतेचा संदेश पसरवेल.