नोकरीची सुवर्णसंधी! पाचोरा येथे २ एप्रिलला रोजगार व समुपदेशन मेळावा
नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व समुपदेशन मेळावा दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय आयटीआय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सारोळा रोड, पाचोरा येथे होणार आहे.
या मेळाव्यात स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल, युवा शक्ती फाउंडेशन, भार्दवाज नेटवर्क सोल्यूशन प्रा. लि. यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार आहेत.
👉 पात्रता:
१० वी, १२ वी तसेच पदवीधर (बी.कॉम., एम.कॉम. इ.) उमेदवार सहभागी होऊ शकतात.
👉 अर्ज प्रक्रिया:
इच्छुकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून संबंधित पदांसाठी अर्ज करावा. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी थेट मेळाव्याच्या दिवशी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
📞 संपर्कासाठी:
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव
दूरध्वनी: ०२५७-२९५९७९०
👉 युवकांनी या संधीचा लाभ घेऊन आपला करिअर मार्ग उजळवावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.