निवृत्ती योजनेचा ‘ऑप्शन’ देण्यासाठी आता भरपूर वेळ; शासनाकडून मुदतवाढीचा जीआर प्रसिद्ध!
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी पर्याय (option) देण्याची मुदत आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
विकल्_प_देण्_यास_मुदतवाढ_३१_१२_२०२६_पर्यंत_2
वरील लिंक करा व GR वाचा👆
पूर्वी ही मुदत 31 मार्च 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांकडून अधिक वेळ देण्याची मागणी होत असल्याने शासनाने ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे अजूनपर्यंत पर्याय सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांनी आता नव्याने विचार करून सुधारित योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
सदर शासन निर्णय 30 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आला असून, तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महत्त्वाचे: पात्र कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आपला पर्याय सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.