मुंबई उच्च न्यायालय भरती 2026: 26 एप्रिलला लेखी परीक्षा
मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 अंतर्गत लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी विविध सत्रांमध्ये होणार आहे.

लिपिक पदाची परीक्षा सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत होईल, तर स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी दुपारी 1 ते 1.30 आणि शिपाई पदासाठी दुपारी 3 ते 3.30 तसेच संध्याकाळी 5 ते 5.30 या दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांनी संबंधित रिपोर्टिंग वेळेनुसार वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी एकूण 2331 पदांसाठी तब्बल 3.64 लाखांहून अधिक पात्र उमेदवारांनी अर्ज केले असून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावरील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.