एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा! निवृत्तांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवनात महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
👉 मोठा निर्णय :निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली.
👉 इतर महत्त्वाचे मुद्दे :
चालक-वाहकांवरील कारवाई व आगारातील अडचणींवर चर्चा
3 वर्षांपेक्षा जास्त एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश
शिस्तभंग कारवाईत पारदर्शकता व न्याय्य प्रक्रिया राबवण्याचा आदेश
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवूनच प्रवाशांना उत्तम सेवा देता येईल. त्यामुळे एसटी प्रशासनाने संघटनांशी संवाद ठेवून सामोपचाराने प्रश्न सोडवावेत, असे निर्देशही देण्यात आले.
या बैठकीस आमदार सदाभाऊ खोत, डॉ. माधव कुसेकर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.