Take a fresh look at your lifestyle.

पुणे महापालिकेची सुवर्णसंधी! UPSC/MPSC स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षणाला मुदतवाढ

0

 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. समाज विकास विभागाच्या वतीने UPSC, MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या मोफत मार्गदर्शन प्रशिक्षणाच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका, समाज विकास विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्गातील एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

📅 अर्ज करण्याची अंतिम मुदत : 30 मार्च 2026

विद्यार्थ्यांनी https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx⁠ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रे आणि दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर, पुणे येथे 06 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

📍 अधिक माहितीसाठी संपर्क

श्री. संदीप कोळपे (सहाय्यक समाज विकास अधिकारी)

समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका

संपर्क : 020-25530550

ही योजना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.