Take a fresh look at your lifestyle.

ऑस्कर 2026 विजेते जाहीर: पहा संपूर्ण माहिती PDF स्वरूपात

0

जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार 2026 चे विजेते जाहीर झाले असून यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अनेक नामांकित कलाकार आणि चित्रपटांनी बाजी मारली आहे.

ऑस्कर_विजेत्यांची_यादी_2026_ (1)

वरील लिंक ला क्लिक करा व GR वाचा👆

यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मायकल बी. जॉर्डन (Sinners) यांना सन्मानित करण्यात आले, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जेसी बक्ली (Hamnet) यांनी पटकावला.

सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून “One Battle After Another” या चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटासाठीच पॉल थॉमस अँडरसन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.

सहाय्यक अभिनेता श्रेणीत शॉन पेन यांनी तर सहाय्यक अभिनेत्री श्रेणीत एमी मॅडिगन यांनी पुरस्कार जिंकला.

संगीत क्षेत्रात लुडविग गोरान्सन यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कार मिळवला, तर “Golden” या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गीत म्हणून गौरवण्यात आले.

आंतरराष्ट्रीय विभागात नॉर्वेच्या “Sentimental Value” या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला.

तसेच, व्हिज्युअल इफेक्ट्स श्रेणीत “Avatar: Fire and Ash” या चित्रपटाने आपली छाप सोडत पुरस्कार मिळवला.

यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव करण्यात आला असून चित्रपटप्रेमींसाठी हा सोहळा विशेष आकर्षण ठरला.