Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठांसाठी आनंदवार्ता: तीर्थदर्शनासाठी शासन उचलणार खर्च

0

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ६० वर्षे व त्यावरील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र तसेच देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थयात्रेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सर्वसामान्य कुटुंबांतील ज्येष्ठ नागरिकांची तीर्थदर्शनाची इच्छा पूर्ण करणे हा आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे तीर्थयात्रा करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना सुरू करून त्यांना दिलासा दिला आहे.

योजनेची व्याप्ती :- या योजनेत महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. पात्र लाभार्थीला निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी एकदाच लाभ घेता येणार आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ३० हजार रुपये इतकी असून त्यामध्ये प्रवास, भोजन, निवास आदी बाबींचा समावेश असेल.

पात्रता निकष :

लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक

वय किमान ६० वर्षे पूर्ण असावे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

या निर्णयामुळे राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार असून शासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारी ही योजना ज्येष्ठांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.