Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल: महात्मा फुले–आयुष्मान योजना एकत्र; १३५६ उपचारांचा समावेश

0

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना एकत्रित राबवण्याबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता महात्मा फुले योजनेतही प्रति कुटुंब वार्षिक आरोग्य संरक्षण मर्यादा १.५ लाखांवरून थेट ५ लाख रुपये करण्यात आली आहे. मूत्रपिंड शस्त्रक्रियेची मर्यादा २.५ लाखांवरून ४.५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

योजनेत ३२८ नवीन उपचारांचा समावेश करून एकूण उपचारसंख्या १३५६ करण्यात आली आहे. अंगीकृत रुग्णालयांची संख्या १३५० पर्यंत वाढणार असून सर्व शासकीय रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे. रस्ते अपघात विमा योजनेतील उपचारसंख्या ७४ वरून १८४ करण्यात आली असून खर्च मर्यादा ३० हजारांवरून १ लाख रुपये करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णय २८ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला.

202307281406324417 (1)

वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर GR वाचा👆