शिक्षणात ऐतिहासिक पाऊल: केरळचा ‘फ्री डिग्री’ निर्णय
तिरुअनंतपुरम : शिक्षण क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरणारा मोठा निर्णय केरळ सरकारने जाहीर केला आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पात राज्यात कला व विज्ञान शाखांमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पदवी शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून पदवी अभ्यासक्रमासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची समान संधी मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
या ऐतिहासिक पावलामुळे शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर होऊन उच्च शिक्षणाचा दर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, केरळचा हा निर्णय देशातील इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो.
शिक्षणासाठी क्रांतिकारी पाऊल उचलत केरळ पुन्हा एकदा देशात आघाडीवर ठरले आहे.