महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी RIMC प्रवेशाची मोठी घोषणा!
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय (RIMC), डेहराडून (उत्तराखंड) येथील इयत्ता आठवी प्रवेशासाठी पात्रता परीक्षा 7 जून 2026 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मुले व मुली दोघेही अर्ज करू शकतात, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.

परीक्षेसाठी उमेदवार 1 जानेवारी 2027 रोजी इयत्ता सातवीमध्ये शिकत असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा 11 वर्षे 6 महिने ते 13 वर्षे अशी असून उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2014 ते 1 जुलै 2015 दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन तसेच डिमांड ड्राफ्टद्वारे उपलब्ध आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – 600 रुपये
अनुसूचित जाती/जमातीसाठी – 555 रुपये
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. पूर्ण भरलेले अर्ज 5 एप्रिल 2026 पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिवाजीनगर, पुणे येथे स्पीड पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. अर्ज थेट डेहराडून येथे पाठवू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी केले आहे.