Take a fresh look at your lifestyle.

आरटीई अंतर्गत २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू; १० मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी

0

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वयं अर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज १७ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत.

ही अर्ज प्रक्रिया https://student.maharashtra.gov.in/adm_portal या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी दिली.

पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.