शिक्षणसेवकांसाठी दिलासादायक GR; तीन वर्षांच्या अटीत मोठी सुधारणा
राज्यातील शिक्षणसेवकांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, शिक्षणसेवकाने एका शाळेतून दुसऱ्या शाळेत नियमानुसार बदली किंवा नव्याने नियुक्ती घेतल्यास त्याला पुन्हा पूर्ण तीन वर्षांचा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण करावा लागणार नाही.
पूर्वीच्या सेवाकालाची दखल
यापुढे अशा प्रकरणांत संबंधित शिक्षणसेवकाने आधीच्या पदावर केलेली सेवा नवीन नियुक्तीच्या तीन वर्षांच्या कालावधीत गणली जाणार आहे. म्हणजेच उर्वरित कालावधीच पूर्ण करावा लागेल. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे उच्च स्तरावर नियुक्ती मिळवणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
कोणाला लाभ?
हा निर्णय शासन निर्णयाच्या दिनांकास ज्यांचा शिक्षणसेवक कालावधी सुरू आहे, अशांनाच लागू राहील. मात्र, ज्यांची सेवा पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली आहे, त्यांना हा लाभ मिळणार नाही.
तसेच, आधीची व सध्याची सेवा मिळून तीन वर्षे किंवा अधिक कालावधी पूर्ण झाल्यास संबंधित शिक्षणसेवकांना तत्काळ नियमित वेतनश्रेणी लागू होणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व 100 टक्के अनुदानित शाळांमधील प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षणसेवकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षणसेवकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शिक्षणसेवक_योजनेत_सुधारणा_करणेबाबत_GR_18_02_2026
वरील लिंक ला क्लिक करा व GR वाचा 👆