Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी-सामान्यांसाठी दिलासा! ‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची राज्यव्यापी सुरुवात

0

महसूल व वन विभागाने राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय १८ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला.

मार्च ते मे २०२६ या कालावधीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर एकदिवसीय समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल ७/१२ वितरण, उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रीमीलिअर प्रमाणपत्रे आदी सेवा तात्काळ देण्यात येणार आहेत.

तसेच अकृषक रूपांतरणासंदर्भातील नव्या तरतुदी, सनद प्रणाली रद्द, एकवेळ अधिमूल्य भरण्याची सोपी पद्धत आणि डिजिटल ७/१२ ला कायदेशीर वैधता याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ पद्धतीने सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहून नागरिकांना तत्काळ सेवा देणार आहेत.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली असून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

202602181531103819

वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर GR वाचा 👆