महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय: कलम ८५ अंतर्गत विभाजन मोहीम जाहीर
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार एकाहून अधिक सहधारक असलेल्या शेती जमिनींच्या हिस्सावाटपासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महसूल व वन विभागाने दिले आहेत.
अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करताना जमिनीची अचूक जोडणी आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सामाईक खात्यात एकूण क्षेत्रफळ एका खातेदाराच्या नावासमोर नोंदले जात असल्याने जमीन खरेदी-विक्री, फेरफार नोंदी व पीक पाहणी प्रक्रियेत अडचणी येत आहेत.
त्यासाठी तालुका व मंडळ स्तरावर विशेष कॅम्प आयोजित करून हिस्सावाटपाची प्रक्रिया सुलभ, वेळबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज करून या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन शासनाने केले आहे.
सदर शासन परिपत्रक 18 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आले असून ते शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कलम_85_नुसार_विभाजन_बाबत_मोहीम_राबविणेबाबत_18_02_2026
वरील लिंक ला क्लिक करा व शासन निर्णय सविस्तर वाचा👆