दृकश्राव्य माध्यमांत करिअरची सुवर्णसंधी: पु. ल. देशपांडे कला अकादमीचे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू!
चित्रपट, दूरदर्शन, वेबमालिका आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या विश्वात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या माध्यमातून विविध दृकश्राव्य माध्यमांचे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

या अभ्यासक्रमांतर्गत चित्रपट निर्मिती, माहितीपट, कॅमेरावर्क, संपादन, ध्वनीमुद्रण, पटकथा लेखन, वेबमालिका निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. माध्यम क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
अभ्यासक्रमात अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, उद्योगक्षेत्राशी थेट संबंधित प्रशिक्षण तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असेल. सर्जनशीलतेसोबत व्यावसायिक कौशल्यांचा विकास करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यांना माध्यम क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
📅 सत्र प्रारंभ : १ एप्रिल २०२६
🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ मार्च २०२६ (सायं. ५ वाजेपर्यंत)
इच्छुक विद्यार्थ्यांनी www.pldeshpandekalaacademy.org (उपक्रम) या संकेतस्थळावरील गूगल फॉर्म भरून अर्ज सादर करावा.
📍 पत्ता : सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५
📧 ईमेल : pldeshpande111@gmail.com
📲 अधिक माहितीसाठी WhatsApp : ९८१९८२४९५४
माध्यम क्षेत्रात करिअरची स्वप्ने साकार करण्यासाठी ही संधी गमावू नका, असे आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.
