Take a fresh look at your lifestyle.

सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींना फेलोशिप प्रदान करण्याची योजना वर्ष 2025-26 साठी अर्ज करण्याचे आवाहन

0

सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी), सांस्कृतिक कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत कार्यनिष्पादन, साहित्य, प्लास्टिक आर्ट्स तसेच संस्कृतिशी संबंधित नवीन क्षेत्रांमध्ये संशोधन-आधारित प्रकल्प हाती घेण्यासाठी ज्युनियर व सीनियर फेलोशिप साठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

सन 2025-26 करिता दि. 18.10.2025 पासून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. सदर वर्षी ज्युनियर व सीनियर फेलोशिपसाठी प्रत्येकी 200 पुरस्कार असतील. योजनेचा तपशील, अर्जदारांकरिता निर्देश, पात्रता अटी- अर्हता तसेचअर्ज प्रपत्र भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालय व सीसीआरटी यांच्या खालील वेबसाइट्सवर उपलब्ध असतील.

www.indiaculture.gov.in

www.ccrtindia.gov.in