Take a fresh look at your lifestyle.

मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी २० सप्टेंबर रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन…

0

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) च्या वतीने मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सीओईपी अभियांत्रिकी विद्यापीठ, पुणे येथे कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.

या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील यशस्वी व तज्ञ उद्योजक, शासनाच्या उद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यातून उद्योजकांना नवीन संधी आणि मार्गदर्शन मिळणार असल्याने मातंग समाजातील उद्योजक, अभियंते आणि होतकरू तरुणांनी या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.