कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना…
सारथीमार्फत उदयोन्मुख कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना
वसंतदादा साखर संस्था, पुणे येथील इंडस्ट्रियल फर्मिनेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी (IFAT) आणि Wine Brewing and Alcohol Technology (WBAT) विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के शैक्षणिक शुल्क रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात प्रदान
IFAT मधील एकूण ८० विद्यार्थ्यांना ४९.४० लाख व WBAT मधील एकूण २८ विद्यार्थ्यांना ३४.५४ लाख रूपये शैक्षणिक शुल्क अदा
यापैकी २०२२-२०२३ मधील पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण सात विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथी अग्रेसर
सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेमध्ये राहुरी येथी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण; यामध्ये ३३० शेतकऱ्यांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण
शेतकरी मावळा सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण, यामध्ये वार्षिक लाभार्थी ५०० असून २०२५ पासून हे प्रशिक्षण सुरू
पशुधन संगोपन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत वर्षभरात एक हजार लाभार्थ्यांना उरळी कांचन येथील बायफ या संस्थेमार्फत ३० दिवसीय निवासी प्रशिक्षण, ६० दिवसीय प्रक्षेत्रिय प्रशिक्षण ८९ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते.
सारथीच्या उपक्रमांच्या माहितीसाठी सारथीचे संकेतस्थळ
https://www.sarthi-maharashtragov.in/
ला भेट द्यावी.