Take a fresh look at your lifestyle.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांगांसाठी महाशरद पोर्टल कार्यान्वित

0

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन विभागामार्फत दिव्यंग व्यक्ती साठी महाशरद पोर्टल सुरु करण्यात आले आहे. राज्यातील दिव्यंग व्यक्तींनी सदर पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणीच्या अनुषगाने सदर पोर्टलरुपी अभियान राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असून ज्यामध्ये थेट शासनाच्य मंचाव्दारे मागणी करु शकतात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमूद केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मचावर नोंदणी करुन आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशुरु व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामुल्य जोडणारा दुवा आहे. पोर्टलवर दिव्यांग नोंदणी चे फायदे महाराष्ट्रातील दिव्यांगांना अस व्यासपीठ तयार करुन देणे ज्यामध्ये विविध भागातील सर्व कोणत्याही पध्दतीचे दिव्यांग आपलं नाव सहज नोंदवू शकतात राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार आणि लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.