Take a fresh look at your lifestyle.

दिव्यांग बांधवांची गैरसोय थांबावी याकरिता आगाऊ बुकिंग कुपन प्रणाली सुरु -दिव्यांग बोर्ड

0

जळगाव- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतच्या कार्यवाहीसाठी दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी तारखेचे कुपन आगाऊ देण्यात येत असते. ज्या बांधवांना कुपन आवश्यक आहे, त्यांनी शासकीय कामकाजाच्या कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत कुपन घेण्यासाठी यावं असे आवाहन रुग्णालयाच्या दिव्यांग बोर्डातर्फे करण्यात आले आहे. रुग्णालयात कोरोनाविरहित आजारांवर उपचार सुरु झाले आहे. त्यासोबत दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय तपासणी दर बुधवारी सकाळी ९ वाजता सुरु होते. दिव्यांग बांधवांची गैरसोय थांबावी याकरिता आगाऊ बुकिंग कुपन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार हे कुपन शासकीय कामकाजाच्या कोणत्याही दिवशी मिळत असून कार्यालयीन वेळेतच घ्यायला यावे असे आवाहन करण्यात आला आहे.