Take a fresh look at your lifestyle.

जळगांव जिल्ह्यातील मागासवर्गीय योजनेच्या लाभापासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी

0

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसुचित जाती, इतर मागास वर्गीय, विजाभज व विशेष मागास प्रवर्ग यावर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर 2021-22 या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीच्या विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येतात यासाठी शिष्यवृत्तीच्या विविध योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 14 डिसेंबर, 2021 पासून महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. सदर योजनेपासून एकही मागासवर्गीय पात्र विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्यांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे केल्यात.