Take a fresh look at your lifestyle.

आता AI बनवणार नवे सॉफ्टवेअर; सीईओ एलॉन मस्क यांची घोषणा

0

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी तंत्रज्ञान विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ‘मॅक्रोहार्ड’ नावाची एक नवीन ‘एआय’ सॉफ्टवेअर कंपनी सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या कंपनीत ‘एआय’कडूनच नव्या सॉफ्टवेअर्सची निर्मिती केली जाईल. या कंपनीकडे सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ला थेट आव्हान देणारी कंपनी म्हणून पाहिले जात आहे.

मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर एका पोस्टद्वारे या नवीन कंपनीची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, ‘मॅक्रोहार्ड हे नाव कदाचित विनोदी वाटेल; पण हा एक खूप मोठा प्रकल्प आहे.’

दरम्यान, ही कंपनी मस्क यांच्या सध्याच्या ‘xAI’ या कंपनीसोबत मिळून काम करेल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांना टक्कर देईल.