आता FASTag बाबत नवा नियम लागू…
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच एनएचएआयने फास्टटॅगसंदर्भात नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमामुळे टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होईल असं सांगितला जात असून हा नवा नियम फास्टटॅग ब्लॅक लिस्ट करण्यासंदर्भात म्हणजेच फास्टटॅग काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात आहे.
फास्टटॅगसंदर्भात काही वाहनचालकांना असलेल्या एका अत्यंत चुकीच्या सवयीवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
एवढा कठोर निर्णय का- अनेकदा टोलनाका असलेल्या महामार्गावर प्रवास करताना काही वाहनचालक वाहनाच्या दर्शनी भागी असलेल्या काचेवर म्हणजेच विंडशिल्डवर ‘फास्टॅग’चं स्टीकर लावत नाही. अनेकदा असे वाहनचालक आपल्याकडी ‘फास्टॅग’चा स्टीकर हातात घेऊन दाखवितात.
मात्र आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. विंडशिल्डवर फास्टटॅगचा स्ट्रीकर न लावणाऱ्या अथवा तो हातात धरुन दाखवणाऱ्या वाहनचालकांचे ‘फास्टॅग’ काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत. याबाबत नवा नियम लागू करण्यात आला आहे.
या नियमामुळे टोलनाक्यावरील गर्दी कमी होण्याबरोबरच गैरप्रकारही रोखण्यात यश येईल, असा दावा करण्यात आला आहे.