Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो, कीटकनाशक खरेदीसाठी मिळणार तब्बल ‘इतके’ टक्के अनुदान…

0

गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय खूपच आव्हानात्मक बनला आहे. शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. विशेषतः खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या खरेदीसाठी मोठा खर्च करावा लागतो.

या परिस्थितीत आता शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना औषध खरेदीवर 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत कीटकनाशक, बुरशीनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाईल. ही रक्कम औषधांच्या किमतीच्या 50 टक्के किंवा प्रति हेक्टरी कमाल 2500 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल. राष्ट्रीय पोषण व अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हे अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना शेतकऱ्यांना 7/12 उतारा, जीएसटी असलेले खरेदी बिल, आधार कार्डची झेरॉक्स आणि राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतील. ही योजना शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.