Take a fresh look at your lifestyle.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील तरुणांनो शासनाच्या ‘या’ खास योजनेचा लाभ घ्या!

0

भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक योजना राबवत असतात.

त्यामध्ये खास आखलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे मार्जिन मनी योजना ही योजना स्टँडअप इंडिया योजनेच्या अनुषंगाने राबवली जाते. या योजनेंतर्गत नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते, विशेषतः भांडवल उभारणीसाठी ‘मार्जिन मनी’ किंवा भांडवली हिस्सा देण्यात येतो.

मार्जिन मनी योजना- मार्जिन मनी योजनेचा मुख्य उद्देश

म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील तरुणांना उद्योग उभारणीसाठी प्रेरित करणे, तसेच त्यांना स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत आवश्यक असणारा भांडवली हिस्सा राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देणे.

मार्जिन मनी योजना ८ मार्च २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात आली आहे.

संपर्क माहिती: आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधावा.

सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग

अधिकृत वेबसाईट: sjsa.maharashtra.gov.in

मार्जिन मनी योजना ही केवळ आर्थिक सहाय्य पुरवणारी योजना नाही, तर ती अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील तरुणांना आत्मनिर्भरता आणि उद्योजकतेकडे घेऊन जाणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बेरोजगार तरुणांनी ही सुवर्णसंधी वापरून आपले भविष्य घडवावे, आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पावले उचलावीत.