लवकर करा अर्ज – मिळवा हक्काच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधा!
“वसतीगृह प्रवेश प्रक्रिया 2024-25” — जळगाव जिल्ह्यात प्रारंभ!
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील शासनमान्य वसतीगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रवेश कोणासाठी
▪️ इतर मागास वर्ग (OBC)
▪️ विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT)
▪️ विशेष मागास प्रवर्ग (SBC)
▪️ आर्थिक दुर्बल घटक (EWS)
या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना निवास, भोजन, वाचनालय, अभ्यासासाठी पोषक वातावरण, तसेच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
उपलब्ध जागा:
▪️ एमआयडीसी, जळगाव – मुलांसाठीचे वसतीगृह (9 जागा)
▪️ मेहरुण रोड, जळगाव – मुलींसाठीचे वसतीगृह (11 जागा)
ऑनलाईन अर्ज सुरुवात: 29 ऑगस्ट 2025
अर्जासाठी लिंक: https://hmas.mahait.org
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:
🔹 शैक्षणिक दाखले
🔹 जात प्रमाणपत्र
🔹 उत्पन्न प्रमाणपत्र
🔹 रहिवासी दाखला
🔹 आधार कार्ड इत्यादी
आरक्षणाची रचना:
🔸 इतर मागास वर्ग: 51%
🔸 विजाभज: 33%
🔸 विमाप्र: 6%
🔸 दिव्यांग: 4%
🔸 अनाथ: 2%
🔸 EWS: 4%
अधिक माहितीसाठी संपर्क: सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव
पत्ता: सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ, जळगाव