Take a fresh look at your lifestyle.

जळगांव जिल्ह्यातून जाणाऱ्या “नवीन वंदे भारत” चा टाइमटेबल जाणून घ्या…

जळगाव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी! नवीन वंदे भारत एक्सप्रेस अजनी (नागपूर) - पुणे मार्गावर!

0

रेल्वे मंत्रालयाने अजनी (नागपूर) – पुणे मार्गावर नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मान्यता दिली असून, या गाडीस जळगाव येथे थांबा देण्यात आलेला आहे. ही सेवा लवकरच सुरू होणार असून आठवड्यातून 6 दिवस धावेल.

🚆 26102 – अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्सप्रेस

🔸 भुसावळ स्थानकावर आगमन – दुपारी 2.55

🔸 प्रस्थान – दुपारी 3.00

🔸 जळगाव स्थानकावर आगमन – दुपारी 3.26

🔸 प्रस्थान – दुपारी 3.28

🚆 26101 – पुणे – अजनी (नागपूर) वंदे भारत एक्सप्रेस

🔸 जळगाव स्थानकावर आगमन – दुपारी 12.35

🔸 प्रस्थान – दुपारी 12.37

🔸 भुसावळ स्थानकावर आगमन – दुपारी 1.05

🔸 प्रस्थान – दुपारी 1.10

या गाडीस बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर व दौंड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

गाडीची नियमित सेवा अजनीहून सोमवार वगळता 6 दिवस आणि पुण्याहून मंगळवार वगळता 6 दिवस चालेल.

या गाडीचे मुख्य देखभाल केंद्र नागपूर येथे राहील.

सर्व जळगावकर नागरिकांनी या उच्चगती व आरामदायक प्रवासाच्या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा!

पुणे आणि नागपूरकडे जलद व सुखकर प्रवासासाठी ही वंदे भारत सेवा ठरेल एक उत्तम पर्याय!